मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामनं ‘बोल्ट’ नावानं एक मॅसेजिंग अॅप्लिकेशन सुरू केलंय. या माध्यमातून तुम्ही आता फोटो आणि व्हिडिओही तुमच्या मित्रांना पाठवू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त एक टच करावा लागले आणि तुम्ही तुमचा फोटो तुमच्या मित्राला पाठवू शकता... जर तुम्हाला व्हिडिओ पाठवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला केवळ स्क्रीनवर हलका दाब द्यावा लागेल.
फोन हलवल्यावर मॅसेज रद्द होईल. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या बोल्ट न्यूझीलंड, सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिकेतच उपलब्ध असेल.
इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, लवकरच ही सुविधा इतर देशांमध्येही सुरु करण्यात येणार आहे. यूझर्सकडून याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सुरुवातीला ही सुविधा काही देशांतच सुरु करण्यात आलीय.
बोल्टच्या माध्यमातून, एका वेळी एक मॅसेज केवळ एकाच मित्राला पाठवता येऊ शकतो. सोबतच फोटो किंवा व्हिडिओवर काही लिहूनही तुम्ही त्याला पाठवू शकता.
महत्त्वाचं म्हणजे, इन्स्टाग्रामची मूळ कंपनी फेसबुकनं नुकतंच आपला मॅसेजिंग अॅप ‘स्लिंगशॉट’ लॉन्च केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.