पॅनासॉनिकचा 'एलिगा यू' बाजारात दाखल

जपानची कंपनी ‘पॅनासोनिक’चा आणखी एक ड्युएल सिमकार्डधारक स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. ‘किटकॅट’ ही आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलीय. 

Updated: Jul 30, 2014, 07:19 PM IST
पॅनासॉनिकचा 'एलिगा यू' बाजारात दाखल   title=
इलुगा यू

मुंबई : जपानची कंपनी ‘पॅनासोनिक’चा आणखी एक ड्युएल सिमकार्डधारक स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. ‘किटकॅट’ ही आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलीय. 

या स्मार्टफोनचं नाव आहे ‘इलुगा यू’... क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसरच्या साहाय्यानं हा स्मार्टफोन चालतो. या ड्युएल सिमधारक फोनमध्ये 2 जीबी रॅम देण्यात आलाय. तसंच यामध्ये 16 जीबी स्टोअरेज देण्यात आलंय. 

या स्मार्टफोनची डिझाईन इतरांहून थोडी वेगळी आढळते. या फोनचा मागच्या बाजुचं पॅनल टेक्सचर्ड क्रिस्टल ग्लासचं आहे. या फोनचा एचडी स्क्रीन 5 इंचाचा आहे. याचं रिझॉल्युशन 1280 X 720 पिक्सलचं आहे. हा स्क्रीन गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसहीत देण्यात आलाय.

याचा रिअर ऑटो फोकस कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. यामध्ये एलईडी फ्लॅशही देण्यात आलाय. त्यामुळे कमी उजेडातही तुम्ही चांगले फोटो काढू शकता आणि व्हिडिओही शूट करू शकता. यामध्ये 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. 

ऑनलाईन रिटेलर ईबेच्या वेबसाईटवर या स्मार्टफोनची किंमत 17,490 रुपये दिसतेय. तर लोकल स्टोअर्समध्ये हा फोन 18,590 रुपयांना उपलब्ध आहे. 

‘इलुगा यू’चे फिचर्स... 
* स्क्रीन - 5 इंच (1280 x 720 पिक्सल)

* प्रोसेसर - 1.2 जीएचझेड क्वॉड कोर स्नॅपड्रॅगन 400 प्रॉसेसर

* सिम - ड्युएल सिम

* रिअर कॅमेरा – 13 मेगापिक्सल, एलईडी फ्लॅशसहीत 

* फ्रंट कॅमरा – 2 मेगापिक्सल

* जाडी आणि वजन - 7.95 मिमी, 141 ग्रॅम

* म्युझिक - 3.5 मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडिओ

* इतर फीचर - 3जी, वाई-फाई 802, ब्लू टुथ 4.0, जीपीएस

* बॅटरी - 2500 एमएएच

* किंमत - 18,990 रुपये (एमआरपी)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.