मुंबई : मुंबईत 'बीएमडब्ल्यू आय8' या आलिशान कारचं शानदार लॉन्चिग झालं, तेही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत...
या कारमध्ये 1500 सीसीचं पेट्रोल इंजिन आहे. सोबतच 131 एचपीचं इलेक्ट्रीक इंजिनही आहे. 47 किलोमीटर प्रति लीटरचं मायलेज ही कार देऊ शकेल, असा दावा कंपनीनं केलाय. ही कार 230 किलोमीटरचा स्पीड घेऊ शकते, असंही म्हटलं गेलंय. जवळपास दोन कोटी किंमत असलेल्या ही स्पोर्टस कारमध्ये इतर स्पोर्टस कारच्या तुलनेत अनेक उत्तम वैशिष्ट्य देण्यात आली आहेत. BMW i8 या स्पोर्टस कारमध्ये 'प्लग इन हायब्रिड सिस्टिम' लावण्यात आली आहेच.
आत्तापर्यंत जगभारात या कारचे 18,000 हून अधिक गाड्या विकल्या गेल्यात तसंच बीएमडब्ल्यूचं प्रवर्तन या कारद्वारे दिसतं, असंही म्हटलं गेलंय.
कंपनीचं हायब्रिड कारचं हे पहिलंच मॉडेल आहे. याची मुंबईतील शोरुममध्ये किंमत आहे 2.29 करोड रुपये...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.