जिओ यूजर्ससाठी मोठी बातमी

तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जिओकडून यूजर्सला फ्री डेटा सर्व्हिस मिळत असली तरी कंपनीकडे खराब नेटवर्कच्या अनेक तक्रारी येत आहेत. 

Updated: Nov 3, 2016, 11:22 AM IST
जिओ यूजर्ससाठी मोठी बातमी title=

नवी दिल्ली : तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जिओकडून यूजर्सला फ्री डेटा सर्व्हिस मिळत असली तरी कंपनीकडे खराब नेटवर्कच्या अनेक तक्रारी येत आहेत. 

या तक्रारीबाबत कंपनीने मोठा निर्णय घेतलाय. पुढील सहा महिन्यांत तब्बल 45,000 नवे टॉवर बसवणार असल्याची घोषणा कंपनीने केलीये. यामुळे कंपनी आपले 4जी नेटवर्क अधिक मजबूत कऱणार आहे. 

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ इनफोकॉम लिमिटेडने मोठा निर्णय घेतलाय. जिओच्या यूजर्सची संख्या सतत वाढत चाललीये. त्यामुळे लोकप्रियता कमी होणार नाही या दृष्टीने कंपनीने ही घोषणा केलीये.

या घोषणेनंतर कंपनी देशातील 18,000 शहरांसोबतच दोन लाख गावांमध्ये टण्यासाठी टॉवर लावण्याची कंपनीची योजना आहे. पुढील चार वर्षात कंपनी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवे टॉवर लावण्याच्या योजनेतही ही गुंतवणूक असणार आहे.