सकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!

भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.

Updated: Aug 28, 2015, 12:31 PM IST
सकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल! title=

नवी दिल्ली : भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.

लिंबूसहीत कोमट पाणी प्यायल्याचा फायदा लवकरच तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसून येईल. दररोज सकाळी अस कोमट पाणी घेतल्यानं तुमचा चेहरा आणि त्वचा उजळून निघेल. 

अधिक वाचा - केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय!

लिंबूयुक्त कोमट पाणी प्यायल्यानं शरीरातील दूषित पदार्थ बाहेर निघून जाण्यास मदत होते. यामुळे, पचनशक्तीलाही मदत होते. लिंबूमध्ये मिनरल्स आणि विटॅमिन असतात, जे पचनशक्ती वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरतात. 

लिंबूमध्ये 'विटॅमिन सी'देखील मोठ्या प्रमाणात असतं. जे तुम्हाला सर्दी-खोकल्या आणि अशा संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी मदत करतं. लिंबूमध्ये आढळणारं पोटॅशिअम तुमचा मेंदू आणि नर्वस सिस्टलाला दुरुस्त ठेवतं. तसंच यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. 

अधिक वाचा - 'थायरॉइड'बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्या!

लिंबूपाणी प्यायल्यानं दूषित पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. ज्यामुळे त्वचाही साथ होते.  विटॅमिन सीमुळे त्वचा मुलायम आणि हेल्दी बनते. 

लिंबूपाणी प्यायल्यानं वजनही कमी होण्यास मदत होतं असं अनेक शोधांमधून समोर आलंय. यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि वजन कमी होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.