महिंद्राची दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टीयूव्ही ३००' लॉन्च!

महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एका नव्या गाडीचा समावेश केलाय. टीयूव्ही ३०० ही नवी कोरी गाडी महिंद्रानं बाजारात उतरवलीय. 

Updated: Sep 10, 2015, 04:52 PM IST
महिंद्राची दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टीयूव्ही ३००' लॉन्च! title=

पुणे : महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एका नव्या गाडीचा समावेश केलाय. टीयूव्ही ३०० ही नवी कोरी गाडी महिंद्रानं बाजारात उतरवलीय. 

एसयूव्ही सेगमेंटमध्ये इतक्या कमी किंमतीत गाडी लॉन्च करून महिंद्रानं 'प्राईज वॉर' सुरू केलंय. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल १२ महिन्याननंतर महिंद्रानं आपलं एक नवं मॉडेल बाजारात उतरवलंय. यापूर्वी महिंद्रानं सप्टेंबरमध्ये नव्या जनरेशनची स्कॉर्पिओ बाजारात आणली होती. 

'टीयूव्ही ३००' या गाडीचं सध्या केवळ रिअर व्हिल ड्राईव्ह व्हर्जन बाजारात आणलंय. ४ व्हिल ड्राईव्ह मॉडल नंतर लॉन्च होईल. ही गाडी बॉक्स डिझाईनमध्ये बनवण्यात आलीय. ही गाडी सहा प्रकारांत उपलब्ध होऊ शकेल.

यामध्ये दोन मोठ्या विंडो दिल्या गेल्यात. समोरचा भाग थोडा वर उचललेला आहे. विशेष म्हणजे, गाडीचं ग्राऊंड क्लिअरन्सही मोठा आहे. मोठे अलॉय व्हिल आणि स्ट्रेट बोनट देण्यात आलंय. स्टिअरिंगवर ब्लूटूथ टेलिफोन कंट्रोल करण्याचा सिस्टम देण्यात आलाय. 

५ स्पीडगिअरसोबतच १.५ लीटचे ३ सिलेंडर या गाडीत देण्यात आलेत. तर या गाडीला एमहॉक ८० इंजिन जोडलं गेलंय. या गाडीचं तुम्हाला मायलेज १८.४९ किलोमीटर/लीटर मिळू शकेल.

तसंच या गाडीत ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशनही देण्यात आलंय. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवताना चांगलं मायलेजही मिळेल. सेफ्टीसाठी ड्युएल एअरबॅग आणि अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टमही उपलब्ध आहे. 

या गाडीची किंमत ६.९ लाख (एक्स शोरुम, पुणे) पासून सुरू होणार आहे. टॉप अॅन्ड मॉडेल टीऑटो शिफ्टची किंमत ९.१२ लाख असेल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.