ऑटोग्राफ 'आऊट डेटेड', 'सेल्फी'ची क्रेझ!

'ऑटोग्राफ'ला आऊटडेटेड ठरवत २०१४ या वर्षात भारतात 'सेल्फी' हा शहरी संस्कृतीचा एक भाग झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. 

Updated: Dec 23, 2014, 08:03 AM IST
ऑटोग्राफ 'आऊट डेटेड', 'सेल्फी'ची क्रेझ! title=

मुंबई : 'ऑटोग्राफ'ला आऊटडेटेड ठरवत २०१४ या वर्षात भारतात 'सेल्फी' हा शहरी संस्कृतीचा एक भाग झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. 

सेलिब्रिटिंची घेतलेली भेट असो, मित्रांबरोबर धम्माल मस्तीत व्यतीत केलेला वेळ असो, एखाद्या सुंदर ठिकाणाला दिलेली भेट असो, आपला नवीन पेहराव दाखवायचा असो किंवा नवीन हेअरस्टाईल... इतरांना कुणाला फोटो काढण्यासाठी त्रास न देता 'सेल्फी'चाच फंडा अनेक ठिकाणी वापरण्यात आला. 

स्वत:ला व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणून 'सेल्फी'कडे पाहिलं जाऊ लागलं... आणि लाखो लोकांची पसंती सेल्फीला मिळाली. 

अभिनेता शाहरुख खान कोलकात्याता आपल्या 'हॅपी न्यू इअर'च्या प्रचारासाठी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पोहचला तेव्हा त्याच्याकडे कुणीही कागद किंवा पेन देऊन ऑटोग्राफ देण्याची मागणी केली नाही. उलट, प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण आणि 'किंग खान'सोबतचा आपला 'सेल्फी' कॅमेऱ्यात कैद करायचा होता.... आणि लगोलग हे सेल्फी सोशल वेबसाईटवरून आपल्या इतर मित्रांशी शेअरही करायचा होता. 

'ऑटोग्राफ'च्या युगाचा अंत झाल्याची घोषणा करणाऱ्या पहिल्या व्यक्तींमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचाही समावेश होता. मे २०१४ मध्ये त्यानं 'आठ वाजता सकाळच्या अगोदरच, पहाटेच्या फेरफटक्यात आत्तापर्यंत पाच सेल्फी काढल्या गेल्यात आणि यासोबतच मला ऑटोग्राफचं युग समाप्त झाल्याचं दिसतंय' 


नरेंद्र मोदी आणि पूनम महाजन

केवळ महाविद्यालयीन तरुण - तरुणींवर केवळ सेल्फीची जादू पसरलीय असं नाहीय... तर यामध्ये दिग्गज सेलिब्रिटी, राजकारणी नेते, खेळाडू, सामान्य लोक इतकंच नाही तर पोपही सेल्फीचाच वापर करताना दिसले. 

लोकसभा निवडणुकीच्या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनाही अनेक वेळा सेल्फी काढताना पाहण्यात आलं. ते आपल्या आईची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनीही 'सेल्फी'चा आनंद लुटला. त्यांची ही सेल्फी भलतीच लोकप्रिय ठरली आणि मोठ्या संख्येत रि-ट्विटही केली गेली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.