हैदराबादमध्ये गूगल उघडणार त्यांचा स्वत:चा मोठा कँम्पस

इंटरनेटचं सर्वात मोठं जाळं असणाऱ्या गूगलने लवकरच स्वत:चं मोठं कँम्पस हैदराबादमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 21, 2014, 06:35 PM IST
हैदराबादमध्ये गूगल उघडणार त्यांचा स्वत:चा मोठा कँम्पस title=

हैदराबाद : इंटरनेटचं सर्वात मोठं जाळं असणाऱ्या गूगलने लवकरच स्वत:चं मोठं कँम्पस हैदराबादमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादमध्ये स्थापन केलं जाणारं गुगलचं हे तिसरं कँम्पस असेल. असे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सचिव हरप्रित सिंग यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

याआधी यूके आणि तेलंगणा मध्ये यांचं कँम्पस आहे.  गुगलचं कँम्पस हे सध्या भाड्याच्या जागेच्या आवारात असून त्यांना ते स्वत:च्या मालकी हक्काच्या जागेवर स्थलांतरित करायचे आहे.

सूत्रांकडून अशीही माहिती मिळत आहे कि यावर लवकरच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यात या सगळ्याचा खुलासा केला जाईल.

मि. सिंग यांनी असं देखील म्हटलं आहे की त्यांना हैदराबादला एक वाय-फाय शहर म्हणून ओळख द्यायची आहे.

कदाचित पुढील वर्षाच्या शेवटी हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.