आसुसचा फोनपॅड टॅब ८ हजार ९९९ रुपयात

स्मार्टफोन सोबतच टॅबही आता भारतात लोकप्रिय होतांना दिसतोय, याचाच फायदा घेण्यासाठी अनेक मोबाइल कंपन्या नवनवीन टॅब भारतीय बाजारात लॉन्च करण्यास सुरूवात केली आहे. 

Updated: Aug 10, 2014, 10:39 PM IST
आसुसचा फोनपॅड टॅब ८ हजार ९९९ रुपयात title=

मुंबई : स्मार्टफोन सोबतच टॅबही आता भारतात लोकप्रिय होतांना दिसतोय, याचाच फायदा घेण्यासाठी अनेक मोबाइल कंपन्या नवनवीन टॅब भारतीय बाजारात लॉन्च करण्यास सुरूवात केली आहे. 

आता या स्पर्धेत 'आसूस' कंपनी देखील उतरली असून 'आसूस'ने फोनपॅड ७ (FE170CG) वॉइस कॉलिंग टॅब नुकताच भारतात लाँच केला आहे.

ड्यूल सिम-कार्ड सपोर्ट असणाऱ्या या टॅबमध्ये वॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. बाजारात या टॅबला कितपत पसंती मिळणार हे लवकरच कळेल. ८९९९ रुपयात हा फोन बाजारात उपलब्ध आहे.

आसूस फोनपॅड ७ (FE170CG) टॅबची वैशिष्ट्ये:

1) १०२४x६०० पिक्सल रेझ्युलेशन ७ इंच डिस्प्ले

2) ४.३ जेली बीन अँड्रॉईड जेन यूआई स्किन 

3) हायपर-थ्रेडिंग टेक्नो १.२ गीगाहर्त्झ ड्यूल-कोअर इंटेल ऐटम प्रोसेसर, एक जीबी रॅम

4) २ मेगापिक्सल कॅमेर, ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

5) इंटरनल स्टोरेज ४ आणि ८ जीबी क्षमता

6) ६४ जीबी मायक्रो-एसडी कार्ड 

7) ११ जीबी आसूस वेब स्टोरेज क्लाउड स्पेस (पहिल्या वर्षासाठी) त्यानंतर लाइफटाइम ५ जीबी

8) १० तास बॅटरी क्षमता 

9) वाय-फाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस आणि ३जी 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.