न्यूयॉर्क : अॅपल जगात सर्वांत जास्त भांडवल असणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. कारण अॅपल कंपनीचे शेअर बाजारातील भांडवल 700 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. अॅपल कंपनीचे भांडवल 42 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या एक तृतीयांश इतके आहे.
ज्या दिवसापासून ‘अॅपल कंपनीचा शेअर बाजारात व्यवहार करत आहेत, त्या दिवसापासून आजतागायत ‘अॅपल‘च्या शेअरने 23,639 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
‘अॅपल‘ कंपनीचे नुकतेच तिमाही निकाल नुकतेच जाहीर झाले. अॅपल कंपनीच्या इतिहासातील सर्वांत मोठा नफा या तिमाहीत झाला आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार ‘अॅपल‘ कंपनीचा शेअर आज 122 डॉलर प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.
अॅपलने 27 डिसेंबर रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत 74.5 दशलक्ष आयफोनची विक्री केली आहे. काही तज्ज्ञांच्या मते फक्त 70 दशलक्ष आयफोन विक्रीचा अंदाज लावण्यात आला होता. गेल्या वर्षी कंपनीचे उत्पन्न 57.6 अब्ज डॉलर होते. त्यातुलनेत यावर्षी उत्पन 74.6 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.
प्रत्येक अमेरिकी नागरिकला कंपनीने पैसे द्यायचे ठरवल्यास प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला 556 अमेरिकी डॉलर्स येतील. कंपनीला यातिमाहीत 18 अब्ज डॉलरचा नफा झाला आहे. कोणत्याही सार्वजनिक कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा नफा आहे. आता ऍपल इंककडे 178 अब्ज डॉलरचा रोख निधी जमा झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.