स्वस्त दरात 4 जी हँडसेट आणण्याची एयरटेलची योजना

दूरसंचार कंपनी भारती एयरटेल ऑक्टोबरपर्यंत 4जी हैंडसेट बाजारात आणणार आहे, ज्याची किंमत ४ हजार असणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Updated: Jul 20, 2015, 03:41 PM IST
स्वस्त दरात 4 जी हँडसेट आणण्याची एयरटेलची योजना title=

नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी भारती एयरटेल ऑक्टोबरपर्यंत 4जी हैंडसेट बाजारात आणणार आहे, ज्याची किंमत ४ हजार असणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

  
एयरटेलचा दोन सीम असणारा 4जी हैंडसेट बाजारात आणायला विक्रेत्यांशी चालू असलेली बोलणी अंतिम टप्यात आली आहे. या हँडसेटची किंमत ४ हजार ते १२ हजार रूपयांच्या दरम्यान असेल.  

हा हँडसेट एयरटेल ब्रँडचा असेल किंवा को-ब्रँडचा असेल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. एयरटेल कंपनी या बाबतीत चीनमधील हँडसेट बनवणाऱ्या कंपनीशी बोलणी करत आहेत.

एयरटेलचा हा हँडसेट रिलायंस जियो इन्फोकॉमच्या स्वस्त 4जी हँटसेटला टक्कर देईल असे बोलले जात आहे. हा हँटसेट दिवाळीत म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.