मुंबई : चीनची इलेक्ट्रॉनिक कंपनी लीइकोने आपले ७० हजार फोन केवळ दोन सेकंदात ४जी ली १एस हा स्मार्टफोन केवळ दोन सेकंदात विकले गेले. सुप्रसिद्ध इ-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर या फोनची विक्री झाली.
ली इकोसिस्टम टेक्नालॉजीचे मुख्य अधिकारी अतुल जैन यांनी पीटीआईला सांगितलं की ली एस1 ची किंमत 10,999 रुपये आहे. पण एक्सिस बँकेच्या कार्डने जर तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला तो 9,899 रुपयात मिळणार होता.
या स्मार्टफोनचं उत्पादन खर्च 16,042 रूपये आहे, पण कंपनी त्याला सबसिडी किंमतीत विकत आहे. अशी माहिती जैन यांनी दिली आहे.
आज झालेल्या ऑनलाइन सेलला खूप मोठा रिस्पॉन्स आला. आमच्याकडे ७० हजार युनीट विक्रीसाठी होते. सर्व स्टॉक दोन मिनिटात संपला.
या फोनसाठी सुमारे ६.०५ लाख युजर्सने फ्लिपकार्टवर रजिस्ट्रेशन केले होते. कोणत्याही फोनसाठी इतके मोठ्याप्रमाणात नोंदणीची ही पहिली वेळ आहे.
या फोनने यापूर्वीचे नोंदणीचे रेकॉर्ड तोडले आहे. हा फोन ना नफा तत्वावर विकण्यात आला होता.