www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुढील पाच ते दहा वर्षांत बँकिंग क्षेत्रात वीस लाखांपर्यंत रोजगार निर्माण होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
ग्रामीण भागात वित्तीय सेवा पोचवण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आणि नव्या बँक परवान्यांमुळे या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
येत्या महिनाभरात देशात नव्या 10,000 बँक शाखा सुरू होताहेत. त्यामुळे नजीकच्या काळात 50 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी सांगीतलं.
बँकिंग सेक्टरमध्ये सर्वाधीक संधी सरकारी बँकांमध्ये उपब्ध होण्याची शक्यता आहे, कारण अशा बँकांमधील एकूण कर्मचा-यांपैकी सुमारे निम्मे कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवे कर्मचारी बँकांकडून घेतले जातील.
अर्थात 2014 मध्ये रोजगार निर्मीती क्षेत्रात बँकिंग क्षेत्र आघाडीवर रहाण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.