ट्वीटरचे शेअर २३.३ टक्क्यांनी घसरले

न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये गुरूवारी सुरूवातीला ट्वीटरचे शेअर २३.३ टक्क्यांनी खाली आले, असं वृत्त एएफपीने दिलं आहे.

Updated: Feb 9, 2014, 10:59 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये गुरूवारी सुरूवातीला ट्वीटरचे शेअर २३.३ टक्क्यांनी खाली आले, असं वृत्त एएफपीने दिलं आहे.
मात्र रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ट्वीटर आगामी वर्षात मोठ्या प्रमाणात नफा कमावरणार आहेत, असा विश्वास ट्वीटरचे सीईओ डिक कोस्टोलो यांनी व्यक्त केला आहे.
ट्वीटरचे शेअर्स फेसबुकच्या शेअर्स एवढा टप्पा गाठतील असं गुंतवणूकदारांना सुरूवातीला वाटलं होतं, मात्र फेसबुक एवढ्या अपेक्षा ट्वीटरच्या शेअर्सकडून गुतवणूकदारांनी करणे, मुळातच योग्य नसल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे.
ट्वीटरही सोशल नेटवर्किंगमध्ये अमेरिकेची चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे. फेसबुक, गुगल प्लस, लिंक्डइन आणि मग ट्वीटरचा नंबर लागतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा