10 वर्षांचा टिवटिवाट

सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने आज १० वर्ष पूर्ण केली. पहाता पहाता फेसबुक आणि वॉट्सएप प्रमाणेच ट्विटरवरही नेटप्रेमींचा मुक्त वावर अविरतपणे सुरू आहे. 

Updated: Mar 21, 2016, 12:20 PM IST
10 वर्षांचा टिवटिवाट title=

मुंबई: सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने आज १० वर्ष पूर्ण केली. पहाता पहाता फेसबुक आणि वॉट्सएप प्रमाणेच ट्विटरवरही नेटप्रेमींचा मुक्त वावर अविरतपणे सुरू आहे. 

फक्त १४० शब्दांची मर्यादा असलेल्या ट्विट्रने कालांतराने ही मर्यादा काढून टाकली. आता व्हिडिओ, फोटोही ट्विटरवर शेअर करणे शक्य झाल्याने ट्विटरप्रेमींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. 

'जस्ट सेटिंग अप माय ट्विटर' असं ट्विट करून ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी २१ मार्च 2006 ला ट्विटर ही मायक्रो ब्लॉगिंग साईट सुरू केली होती. आणि बघता बघता ट्विटरची ही छोटीशी चिमणी नेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनली. 

मुंबईतला २६/११ चा दहशतवादी हल्ला, टीम इंडियानं जिंकलेला २०११ चा वर्ल्डकप, २०१२ साली झालेला निर्भया सामुहिक बलात्कार, सचिन तेंडुलकरची निवृत्ती आणि १६ व्या लोकसभेची निवडणूक या भारतातल्या टॉप फाईव्ह ट्विटर मोमेंट्स आहेत.