सनस्क्रीन वापरा, त्वचेचा कॅन्सर टाळा!

सनस्क्रीनमुळं तीन प्रकारच्या त्वचेच्या कॅन्सरचं १०० टक्के रक्षण केलं जातं. त्यासोबतच आपल्या त्वचेचं आनुवंशिकतावाहक म्हणजेच ‘सुपरहीरो जीन’चं सुद्धा संरक्षण सनस्क्रीनमुळं होतं, असं नुकतंच एका अभ्यासात पुढं आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 8, 2013, 01:27 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मेलबर्न
सनस्क्रीनमुळं तीन प्रकारच्या त्वचेच्या कॅन्सरचं १०० टक्के रक्षण केलं जातं. त्यासोबतच आपल्या त्वचेचं आनुवंशिकतावाहक म्हणजेच ‘सुपरहीरो जीन’चं सुद्धा संरक्षण सनस्क्रीनमुळं होतं, असं नुकतंच एका अभ्यासात पुढं आलंय.
सनस्क्रीन आपल्याला अति सूर्य प्रकाशात सनबर्नपासून वाचवतं केवळ एवढाच सनस्क्रीनचा उपयोग नाही. तर त्याद्वारं कॅन्सर होऊ न देण्यातही सनस्क्रीन मदत करतं. क्वींसलँड यूनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीनं दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठानं सनस्क्रीनचा पहिला मानव आधारित अभ्यास केलाय. या अभ्यासात संशोधकांच्या लक्षात आलं की बीसीसी, एससीसी आणि मेलिग्नेंट मेलानोमा या तीन प्रकारच्या कॅन्सरपासून सनस्क्रीन तुमचं रक्षण करतं.
विद्यापीठाचे मुख्य संशोधक एल्के हॅकर म्हणाले, की “त्वचेचा कॅन्सर रोखण्यासाठी सनस्क्रीनचा उपयोग होतो. शिवाय पी५३ या जीनचं रक्षण सनस्क्रीन करतं. त्यामुळं सनस्क्रीनचा वापर करणं त्वचेसाठी उपयुक्त ठरेल असंच म्हणता येईल”.
हॅकर म्हणाले, “अति सूर्यप्रकाशामुळं आपल्या त्वचेचं नुकसान होतं. पी५३ या नुकसानाची भरपाई करतं आणि स्क्रीन कॅन्सर होण्यापासून बचाव करतं. मात्र सनबर्न जर सतत होत असेल तर पी५३ जीनमध्ये बदल होतो आणि त्वचेच्या नुकसानाची भरपाई करण्यात जीन अपयशी ठरतं. त्यामुळंच जीनच्या सुरक्षेसाठीही सनस्क्रीन उपयुक्त ठरतं”, असं या संशोधनात पुढं आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.