पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?

मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.

Updated: Apr 15, 2016, 08:12 PM IST
पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न? title=

मुंबई : मुलीचे वडील लग्न ठरविताना अनेक प्रकारे विचार करत असतात. शक्यतो मुलगा निरव्यसनी, पगारदार मुलगा, चांगले घर आणि स्वत:चे घर असावे, असे प्रत्येक मुलींच्या वडिलांना वाटत असते. मात्र, हे जरी असले तरी मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो. मात्र, अॅरेंज मॅरेजमध्ये हे प्रश्न तिला विचारता येत नाही?

 भावी जोडीदारबद्दल मनात काय?

१. तुझी गर्लफ्रेंड होती का? तुमच्यामध्ये काही झालं होतं का?
२. वन नाईट स्टॅंडबद्दल तुझा काय विचार आहे?
३. तुला माझे कपडे पसंत नाहीत का? लग्नानंतर मी छोटे कपडे परिधान केले तर तुला आवडेल का?
४. लग्नानंतर तू कधी कधी जेवण करशील का? दोन्ही वेळचे जेवण मीच करु असा तुझा विचार आहे का?
५. मी कधीही माझी नोकरी, काम सोडणार नाही आणि लग्नानंतर तू मला नोकरी सोडण्यास मजबुर करणार नाहीस ना?
६. तू चांगला आहेस, तरीही तू सिंगल का?
७. तुझा देवावर विश्वास आहे का, तू देवाला मानतोस का?
८. तू तुझ्या एक्स गर्लफ्रेंडवर प्रेम करतोस का?
९. तू लग्न तुझ्या मर्जीने करीत आहेस की घरच्यांच्या सांगण्यावरुन?