लिपस्टिकमुळे होतो डोक्यावर परिणाम!

लिपस्टिक लावणाऱ्या महिलांनो, आता सावध व्हा.. कारण एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे, की जास्त लिपस्टिक लावल्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लिपस्टिकसारख्या उत्पादनांमध्ये शिसं वापरलं आसतं. या धातूच्या संपर्कातही आलं, तरी मेंदू, व्यवहार आणि आकलनशक्ती यावर विपरीत परिणाम होतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 4, 2012, 03:28 PM IST

www.24taas.com, बोस्टन
लिपस्टिक लावणाऱ्या महिलांनो, आता सावध व्हा.. कारण एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे, की जास्त लिपस्टिक लावल्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लिपस्टिकसारख्या उत्पादनांमध्ये शिसं वापरलं आसतं. या धातूच्या संपर्कातही आलं, तरी मेंदू, व्यवहार आणि आकलनशक्ती यावर विपरीत परिणाम होतो.
‘गुड मॉर्निंग अमेरिका’ या वृत्तपत्रात दिल्या गेलेल्या माहितीनुसार संशोधना अंती 22 वेगवेगळ्या ब्रँडच्या लिपस्टिक्सची नावं देण्यात आली आहेत. सध्याच्या ५५% लिपस्टिक्समध्ये विषारी तत्वं असल्याचंही दिसून आलं आहे.
‘अंडररायटर्स’ प्रयोगशाळेत केल्या गेलेल्या चाचणीमध्ये १२ लिपस्टिक्समध्ये शिसं असल्याचं दिसून आलं. या लिपस्टिक्समध्ये शिशाचं सर्वाधिक प्रमाणही आढळलं. डॉक्टर शॉन पालफ्रे यांनी लिपस्टिकपासून सावध राहा असा इशारा देताना सांगितलं आहे की, थोड्या प्रमाणातही शिशाशी संबंध आल्यास आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.तसंच मानसिक स्वस्थ्य ढळतं. त्यामुळे लिपस्टिक वापरताना सावधान!