www.24taas.com, वृत्तसंस्था, टोरंटो
जर तुम्हाला गर्भवती आहे आणि आपलं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असावं, असं आपल्याला वाटतं तर तापमान वाढण्याआधी तुम्ही कुठं थंडीच्या ठिकाणी राहा. कारण वाढलेलं तापमान तुमच्या गर्भधारणेचा कालावधी कमी करू शकतो. एका अभ्यासानुसार हे सांगण्यात आलंय की, जर चार-सात दिवस गर्भवती महिला ३२ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात राहत असेल, तर महिलेची डिलिव्हरी वेळेआधीच होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी वाढतं.
कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ मोन्ट्रियलच्या नथाली उगर यांनी सांगितलं, "अभ्यास सांगतो की गर्भवती असतांना जेव्हा तापमान जास्त वाढतं तेव्हा गर्भाशयाचं आकुंचनही वाढतं. "
मानवाचं शरीर गर्मीनुसार आपल्या शरीरातील तापमान बनवून ठेवतो. अभ्यासामध्ये १९८१पासून तर २०१०पर्यंत कॅनडाच्या मोंट्रियलमध्ये गर्मीमुळं जन्मलेल्या ३,००,००० लोकांची माहिती आहे. ज्याचा रेकॉर्ड पर्यावरण कॅनडानं रेकॉर्ड केलंय. आपल्या अभ्यासात संशोधकांना आढळलं की वाढलेल्या तापमानामुळं वेळेपूर्वी डिलिव्हरी होण्याच्या प्रमाणात वाढ नाही झाली. पण ज्या महिला गर्भावस्थेच्या ३७ किंवा ३८व्या आठवड्यात पोहोचल्या असतील, त्यांच्या डिलिव्हरी वेळेच्या आधी होण्याचं प्रमाण १७ टक्क्यांनी वाढलं.
उगर म्हणाल्या, वेळेपूर्वी ज्या मुलांचा जन्म होतो ते नेहमी कमकुवत आणि आजारी असतात, तर मृत्यूचं प्रमाणही वाढतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.