लठ्ठपणाचा अनुवांशिकतेशी संबंध...

लठ्ठपणा कमी करण्याचं तुम्ही खूप मनावर घेतलंत... आणि त्यासाठी खूप प्रयत्नही करत आहात परंतु, तुम्हाला काही बारीक होण्यात फारसं यश येत नाही... असं जर तुमच्याबाबतीतही घडत असेल तर घाबरण्याचं किंवा निराश होण्याचं काही एक कारण नाही.

Updated: Apr 1, 2014, 05:51 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
लठ्ठपणा कमी करण्याचं तुम्ही खूप मनावर घेतलंत... आणि त्यासाठी खूप प्रयत्नही करत आहात परंतु, तुम्हाला काही बारीक होण्यात फारसं यश येत नाही... असं जर तुमच्याबाबतीतही घडत असेल तर घाबरण्याचं किंवा निराश होण्याचं काही एक कारण नाही.
कारण, शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजन वाढण्याचा संबंध केवळ खाण्याच्या सवयीवर अवलंबून नसून, पाचक प्रणालीशी जोडलेल्या जीन्सशी आहे. म्हणजेच, लठ्ठपणा हा अनुवांशिकही असू शकतो. अभ्यासकांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कार्बोहायड्रेट-पाचक द्रव्यांचं प्रमाण कमी होतं, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढतो.
`वेगवेगळ्या लोकांच्या पाचक प्रणालीमध्ये चयापचयाची क्रिया आणि आनुवंशिकता भिन्नभिन्न असते, जे मनुष्याच्या वजनावर चांगलंच परिणामकारक ठरतं` असं लंडनच्या किंग्स कॉलेजच्या प्राध्यापक टिम स्पेक्चर यांनी म्हटलंय.
अभ्यासकांच्या मते, भिन्न भिन्न शरीर एकाच प्रकारचे अन्न जरी खात असले, तरी त्याची मात्रा ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देते. हेच कारण आहे की, काही लोकांमध्ये वजन वाढण्याची आणि काहींमध्ये वजन कमी होण्याची समस्या उदभवते.
संशोधकांनी काही कुटुंबांतील आनुवंशिकतामधील लठ्ठपणाच्या नमुन्यांचा अभ्यास केला आणि त्यामधून त्यांना ‘एएमवाई १’ आणि ‘एएमवाई २’ असे दोन प्रकारचे असमान जीन्स मिळाले. हे जीन्स लाळोत्पादक आणि स्वादूपिंडाने बाहेर टाकलेला (रस) पिष्टमय पदार्थाचे माल्टोजमध्ये रूपांतर करणारा घटक कोड आहे. याचा अभ्यास ‘अनुवंशिक शास्त्र’मध्ये प्रकाशित केला गेलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.