www.24taas.com, मुंबई
अनुदान किंवा स्कॉलरशिपसारख्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, केवळ आधारकार्ड नाही म्हणून हे लाभ मिळण्यात लाभधारक व्यक्ती अपात्र ठरणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील रहिवाशांना दिलंय.
विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. मुंबईतील २० हजार विद्यार्थी आधार कार्ड नसल्याने स्कॉलरशिपपासून वंचित राहणार असल्याचा मुद्दा संजय दत्त यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देऊन सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. त्यावर उपसभापती वसंत डावखरे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत.
राज्यात २ लाख २९ हजार विद्यार्थी स्कॉलरशिपकरिता पात्र आहेत. त्यापैकी ५८ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी ` आधारकार्डासाठी नोंदणी केलीय. तर अजूनही १ लाख ७० हजार ८२७ विद्यार्थ्यांनी आधारकार्डासाठी नोंदणीच केलेली नाही. त्यातील २० हजार विद्यार्थी केवळ मुंबईतील आहेत, अशी माहिती संजय दत्त यांनी विधानसभेत दिली.