नवी दिल्ली : आज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार ई अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादर होण्याबाबत घटनात्मक पेच निर्माण झालाय.
सर्वसाधारणपणे एखाद्या खासदाराचं निधन झाल्यानंतर संसदेचं कामकाज स्थगित होतं. त्यामुळे ई अहमद यांच्या निधनानंतर हे बजेट सादर होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
बजेट सादर होणार की नाही याचा अंतिम निर्णय आता लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन घेतील.
दरम्यान अशा घटनांसाठी कोणतीही घटनात्मक तरतूद नसून लोकसभा अध्यक्षाच अंतिम निर्णय घेऊ शकतात असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी 'झी 24 तास'शी बोलताना म्हटलंय.
Due to unfortunate passing away of a sitting MP, Speaker will decide if house will be adjourned:Santosh Gangwar,MoS Finance #EAhamed #Budget pic.twitter.com/QFIkUrZTE9
— ANI (@ANI_news) February 1, 2017
खासदार ई अहमद यांच्या अकस्मित निधनानंतर आता संसद स्थगित करण्याविषयी निर्णय अध्यक्ष घेतील, असं वित्त राज्यमंत्री. श्री संतोष कुमार गंगवार यांनी म्हटलंय. सकाळी 10 वाजेपर्यंत हा निर्णय समजण्याची शक्यता आहे.