काँग्रेस खासदार ई अहमद यांचं निधन

माजी पराराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार ई अहमद यांचं निधन झालंय.

Updated: Feb 1, 2017, 09:25 AM IST
काँग्रेस खासदार ई अहमद यांचं निधन  title=

नवी दिल्ली : माजी पराराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार ई अहमद यांचं निधन झालंय.

राष्ट्रपतींचं अभिभाषण सुरु असतानाच संयुक्त सभागृहात ते हदयविकाराच्या धक्क्यानं कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीनं संसदेच्या संयुक्त बैठकीच्या सभागृहातून बाहेर आणण्यात आलं.

यानंतर अॅम्बुलन्सनं त्यांना जवळच्यात राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.