धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

मध्य रेल्वेमार्गावर लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. 

Updated: Feb 1, 2016, 01:23 PM IST
धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू title=

ठाणे : मध्य रेल्वेमार्गावर लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. डोंबिवली आणि कोपर या दोन स्थानकादरम्यान ही घटना घडलीये. 

डोंबिवलीवरुन सकाळी 8.38च्या लोकलमधून ही महिला प्रवास करत होती. लोकलमधील गर्दीमुळे ही महिला चालत्या रेल्वेतून ट्रॅकवर पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. सदर महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु झालेय.

गेल्यावर्षी डोंबिवलीती भावेश नकाते हा तरुण या लोकलच्या गर्दीचा बळी ठरला होता. त्यानंतरही या घटनांचे प्रमाण कमी झालेले नाही.