मुंब्रा इमारत दुर्घटना : दोन बिल्डरांना अटक

ण्यातल्या मुंब्रा परिसरात भानु अपार्टमेंट दुर्घटनेप्रकरणी दोन बिल्डरांना अटक करण्यात आलीय. शकील शेख आणि अकील शेख अशी या बिल्डरांची नावं आहेत. दोन्ही बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 21, 2013, 11:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात भानु अपार्टमेंट दुर्घटनेप्रकरणी दोन बिल्डरांना अटक करण्यात आलीय. शकील शेख आणि अकील शेख अशी या बिल्डरांची नावं आहेत. दोन्ही बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुंब्रा परीसरात भानू अपार्टमेंट पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. बघता बघता होत्याचं नव्हतं झालं... ९ वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीमध्ये ४२ कुटुंब राहत होती... मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास मोठ्याने आवाज झाला आणि इमारत कोसळली... या अपघातात एकाचा बळी गेलाय तर एक जखमी झालाय. अग्निशमन दल, एनडीआरएफने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु केलं... या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त होतेय... घटनेनंतर सामान्यांनी संताप व्यक्त केलाय....
इमारत कोसळल्यानंतर पुन्हा एकदा तेच नेते समोर आले आणि त्यांनी एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दुसरीकडे या प्रकरणी सरकारकडून पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार असल्याचा पाढा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी वाचला.

दुर्घटनेनंतर आनंद परांजपे, गणेश नाईकांनी परिसराचा दौरा केला. त्यांनीही पठडीतली उत्तरं दिली. ठाण्याच्या महापौरांनी तर थेट यासाठी ठाणेकरांना जबाबदार धरलं. मात्र, दुर्घटनेची जबाबदारी घेण्यासाठी कुणीही तयार नाही. सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डरांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरितच आहे.
व्हिडिओ पाहा :

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.