चोरांनीच पोलिसांना गुंगीचे औषध घातलं

नवी मुंबई पोलिसांच्या हाती तुरी देऊन दोन अट्टल आरोपींनी पळ काढला. त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या सात पोलिसांना गुंगीचं औषध देत या दोघा आरोपींनी पोबारा केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2012, 02:06 PM IST

www.24taas.com,नवी मुंबई
नवी मुंबई पोलिसांच्या हाती तुरी देऊन दोन अट्टल आरोपींनी पळ काढला.त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या सात पोलिसांना गुंगीचं औषध देत या दोघा आरोपींनी पोबारा केला.
गुरुचरण सिंग जब्बार कर्नल सिंग चहल आणि सुमीत रामशरण नारोला अशी या दोघा आरोपींची नावं आहेत. या गुन्हेगारांविरोधात दरोडे, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.
कर्नल सिंग चहलवर १८ गुन्हे तर नारोलावर १० गुन्हे दाखल आहेत. तळोजा तुरूंगातून नवी मुंबईत परत येण्यापूर्वी ते जेवणासाठी थांबले तिथे आरोपींनी पोलिसांच्या जेवणात गुंगीचं औषध घातलं आणि पोलीस बेसुद्ध झाल्यावर आरोपी पसार झाले.