www.24taas.com , झी मीडिया, ठाणे
ठाण्यात लवकरच एक नवं पर्यटनस्थळ साकारणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. घोडबंदर रोड इथल्या गायमुख खाडीजवळ बनणारं हे पर्यटन कसं असणार असेल याची उत्सुकता लागली आहे.
घोडबंदर रोड इथल्या गायमुख खाडीजवळ हे नवं पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या जागेत जेटी, हाऊस बोट, साहसी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव आहे. पर्यटनस्थळाबरोबरच धार्मिक विधीकरता लागणारी व्यवस्था आणि विसर्जन घाट बनण्यासाठी सरकारची मान्यता घेतली आहे.
राज्य सरकार आणि ठाणे पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निविदा काढल्यानंतर १३ कोटी ८ लाख एवढी रक्कम पालिकेकडून देण्यात येणार आहे. त्यामुळं ठाणेकरांना आता नव्या पर्यटनस्थळाची सफर करता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ