ठाणे उपमहापौर यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार

ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकरांनी नवनियुक्त उपमहापौर मुकेश मोकाशी आणि भाजप गटनेते संजय वाघुले यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 8, 2014, 09:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकरांनी नवनियुक्त उपमहापौर मुकेश मोकाशी आणि भाजप गटनेते संजय वाघुले यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय.
पाटणकरांच्या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी या दोघांविरोधात मारहाण, शिविगाळ करणे. जीवे मारण्याची धमकी दिल्यासंदर्भात गुन्हे दाखल केलेत. मोकाशी आणि वाघुलेंसह शिवसेना नगरसेवक बाळा राऊत आणि जगदीश थोरात यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वाघुले आणि मोकाशी या दोघांनी मारहाण केल्याचा आरोप पाटणकरांनी केलाय. तसंच या वाघुले आणि मोकाशींच्या दबावामुळेच आपल्याला राजीनामा द्यावा लागल्याचा आरोपही पाटणकरांनी केलाय. ठाणे महापालिका परिवहन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत य़ुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.
या पराभवाचे खापर पाटणकर यांच्यावर फोडण्यात आलं होतं. त्यानंतर पाटणकरांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली होती. तसंच त्यांची पक्षाकडे तक्रार करण्यात आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पाटणकर काही दिवस अज्ञातवासात होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.