ठाण्याला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

यंदा पाऊस उशीरा पडणार असून नेहमीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असणार, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला ठाणे महापालिकनं अगोदरच दिलाय.

Updated: May 9, 2014, 05:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
यंदा पाऊस उशीरा पडणार असून नेहमीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असणार, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला ठाणे महापालिकनं अगोदरच दिलाय.
गेल्याच आठवड्यात १५ टक्के पाणी कपातीचा निर्णय महापालिकनं घेतलाय. मात्र यंदा मुबई आणि ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणा-या धरणात मुबलक पाणीपुरवठा आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडला तरी मुंबई आणि ठाणेकरांना फारशी पाणीटंचाईची तीव्रता शहरांना जाणवणार नाही.
जिल्ह्यातली एक- दोन लहान धरणं सोडली तर इतर सर्वच धरणांची पातळी मे २०१३ च्या तुलनेत अधिक आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडला नाही, तरी पाण्याची टंचाई भासणार नसल्याची माहिती पाटबंधारे ठाणे विभागाकडून देण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.