घरकूल घोटाळा : आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न-खडसे

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी आणि प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आलीय.

Updated: May 9, 2014, 04:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी आणि प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आलीय.
या दोन्ही वकिलांची नियुक्ती रद्द करण्यामागे जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. कारण दोघांच्या नियुक्तीनंतर घोटाळा प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय.
जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणातील आरोपी सुरेश जैन आणि इतर आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. या आरोपींना जामीन मिळवण्यासाठी सूर्यवंशी आणि चव्हाण यांच्या नियुक्ती रद्द केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलाय.
यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या संदर्भात खडसेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना पत्र पाठवलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.