कुडाळमध्ये १८ नव्या कोऱ्या बाईक जाळल्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात होंडा शोरुममधील १८ नव्या बाईक अज्ञाताने जाळल्यात. या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 10, 2013, 10:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ओरोस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात होंडा शोरुममधील १८ नव्या बाईक अज्ञाताने जाळल्यात. या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाईक दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर शोरुममध्ये आणण्यात आल्या होत्या. उद्यमनगर भागात होंडा कंपनीचे शोरुममध्ये आहे. पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शोरूममधील बाईक पेटवून दिल्या आहेत.
या बाईक कोणी जाळल्या याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, कुडाळमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.