www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘लेट-लतीफ’ आणि सुस्त कर्मचाऱ्यांना उपमहापौर आणि सेनेच्या गटनेत्यांनी गांधीगिरीनं चांगलाच धडा शिकवलाय.
कामाच्या वेळी हजर न राहता आरामात उशिरा ऑफिसमध्ये पोहचणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कार्यकर्त्यांनी गुलाबाची पुष्प दिली. त्यामुळे या लेट-लतीफांनाही आश्चर्य वाटलं. कल्याण-डोंबिवली महापालिकेचं कामकाज सकाळी साडे नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान सुरु होतं. परंतु, कर्मचारी खुश्शाल साडे दहा किंवा अकराला येतात. साहजिकच नागरिकांना त्याचा त्रास होतो, त्यांची कामं खोळंबतात.
यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर उपमहापौर राहुल दामले आणि शिवसेना गटनेता कैलास शिंदे यांनी मुख्यालयात धाड टाकली. तेव्हा ९५ टक्के कर्मचारी वेळेत आले नसल्याचं लक्षात आलं. त्यांना गुलाबाचं पुष्प देऊन कामावर लवकर या, अशी विनंती करण्यात आली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.