www.24taas.com, ठाणे
‘अजित पवारांचे `ते` वक्तव्य चुकीचंच होतं, यापुढे अजितदादांनी जपून बोलावं’ असं म्हणत शरद पवारांनी टोचले अजितदादांचे चांगलेच कान टोचलेत. मात्र, याचवेळी त्यांनी माफीनंतर प्रकरणाला पूर्णविराम लागल्याचं सांगत विरोधकांकडून होणारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची राजीनाम्याची मागणीही फेटाळून लावलीय.
अजित पवार यांचं भाषण अयोग्यच असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरप पवार यांनी म्हटलंय. ते ठाण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. यापुढे अजित पवारांनी सांभाळून बोलावं, असा सल्ला शरद पवारांनी दादांना दिलाय. मात्र त्याच वेळी अजितदादांच्या राजीनाम्याची विरोधक करत असलेली मागणी त्यांनी फेटाळून लावलीय. विधानसभेत अजित पवारांनी माफी मागितल्यानंतर आता या प्रकरणाला पूर्णविराम लागला पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी सदन वेठिला धरू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय.
‘उजनी धरणात खरोखर पाणी नाही… धरणातच पाणी नसल्यानं पाणी सोडलं जात नाही’ असं म्हणत शरद पवारांनी दादांच्या भूमिकेचं अप्रत्यक्ष समर्थनही केलंय. जे पाणी उपलब्ध आहे ते केवळ शेतीसाठीच सोडल्याचंही पवार यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी ऊसासह इतर पिकांनाही प्रवाही पद्धतीनं पाणी न देता ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी आग्रह केलाय.