कोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं

गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 4, 2014, 10:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
दिवा-सावंतवाडी या पॅसेंजरला नागोठे इथं झालेल्या अपघातामध्ये 19 जण ठार झालेत तर 100 पेक्षा जास्त जखमी झालेत. जखमींना नागोठणे आणि रोहा इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
एकावर एक चढलेले रेल्वेचे डब्बे... प्रवाशांचा आक्रोश... मदतकार्याचा गोंधळ.. सुन्न करणारी आणि अंगावर काटा आणणारी ही दृष्यं.. दिवा सावंतवाडी पॅसेंजर इंजिनसह चार डब्बे रुळावरुन घसरले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं... नागोठण्याजवळ ही ट्रेन येताच हा भीषण अपघात घडला. या पॅसेंजरला नेहमी गर्दी असते. त्यातच सगळ्या स्टेशनला थांबणारी ट्रेन आणि सध्या सुरु असलेल्या सुट्ट्यांमुळे या ट्रेनला मोठी गर्दी होती. त्यामुळं अपघाताची भीषणताही तितकीच दाहक होती.
अपघातामध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. तर कित्येकजण जखमी झालेत. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलंय. अपघातानंतर राजकीय नेत्यांनी घटनास्थळाला भेटीगाठी देत मदतीचं आश्वासन दिलंय. तर केंद्र सरकार आणि कोकण रेल्वेकडून अपघातग्रस्तांना मदतीचं आश्वासन देण्यात आलंय.
अपघातामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचा खोळंबा झालाय. काही गाड्या रद्द तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. अपघातानंतर नेहमीप्रमाणे एसटी रेल्वेच्या मदतीला धावून आलीय. प्रवाशांसाठी अतिरिक्त एसटीही गाड्या सोडण्यात आल्यात.
रेल्वे अपघात झाल्यावर नेहमीप्रमाणे मदत जाहीर झाली. राजकारण्यांनी घटनास्थळाला भेटही दिली. मात्र वारंवार घडणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
रेल्वे अपघातातील मृतांची नावं
 भरत बळीराम सुर्वे (४९)
 कृष्णा तुकाराम सुर्वे (७०)
 सुरेखा जयराम नाकती (३५)
 विक्रांत बाळकृष्ण सुर्वे
 चिंटू गोसावी (२२)
 प्रदीप पारवे
 मिथिल जोशी
 कमलेश चव्हाण
 श्रद्धा कोकणे
रेल्वे अपघातातील जखमींची नावं
 वैभव विश्राम (३०) (संगमेश्वर)
 अंकिता महाडिक (२०) (माणगाव)
 प्रकाश महादेव पांरागे (५५) (वडाळा)
 रिमा दिलीप राणे (३३) (राजापूर)
 उल्हास शंकर कडवेकर (३८) (संगमेश्वर)
 उत्तरशा उल्हास कडवेकर (संगमेश्वर)
 रविंद्र सीताराम सावंत (५०)
 दीपक जगीभार (३५) (संगमेश्वर)
 हेमंत पांडे
 जगन्नाथ बाळाजी नकाते (४०)
 अनंत सावंत (६०) (चिपळूण)
 सोहन सुर्वे (३०)
 केतन दुंगार (३५)
 अक्षय नामदेव वेंगुर्लेकर (३०) डोंबिवली
 निखील उल्हास कडवेकर (१५) (संगमेश्वर)
 सायली उल्हास कडवेकर (१६) (संगमेश्वर)
 प्रदीप शंकर सांगरे (१७) (संगमेश्वर)
 रत्नाकर गोपाळ दळवी (१३) (कणकवली)
 प्रेरणा प्रदीप सांगरे (२८)
 भागश्री तळे (पाली)
 भालचंद्र नारायण तळे (पाली)
 अनंत यशवंत तळेकर (५२)
 कविता हुळे (६०) (वैभववाडी)
 हर्षदा दिलीप राणे (८)
 दीपक दत्तात्रय कोळेकर (२५) (भिवंडी)
 वैभव विष्णू गोसावी (१८) (वणी)
 शांता आडावकर (६०) (खांदेश्वर)
 दिपाली दत्तात्रय पोळेकर (५०) (गोवंडी)
 दीपक रॉय (५०) कल्याण
 विनय मुक्ते (१८)

खालील डाऊन रेल्वे गाड्या रद्द, कोकण रेल्वेकडून माहिती
> 50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द(4 मे 2014)
> उद्याची 10103 सीएसटी मडगाव मांडवी एक्स्प्रेस रद्द (5 मे 2015)
> तर आजची दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर रोहा-सावंतवाडी-मडगाव दरम्यान रद्द..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.