रूळ तुटल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर घसरली?

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात रेल्वे रूळ तुटल्याने झाला असावा, असं रायगड पोलिसांनी म्हटलं आहे. या अपघातात 15 जण ठार झाले आहेत, तर 96 जण जखमी आहेत.

Updated: May 4, 2014, 02:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवा-सावंतवाडी रेल्वे अपघात रेल्वे रूळ तुटल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज रायगड पोलिसांनी सुरूवातीला लावला आहे. या अपघातात 15 जण ठार झाले आहेत, तर 96 जण जखमी आहेत.
रायगड जिल्ह्यातील नागोठण्याजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरच्या इंजीनसह चार डबे रूळावरून घसरले आहेत.
या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक जवळ-जवळ ठप्प झाली आहे, तसेच अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. हा अपघात सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी झाला.
अपघाताचं ठिकाण मुंबईपासून 135 किलोमीटर लांब आहे. मंगला आणि निजामुद्दीन एक्स्प्रेस खेडजवळ रखडली आहे.
कोकण रेल्वे 02352 - 228176 / 228951 / 228954 हेल्पलाईन नंबर
12052 जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.