कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी शेल्टर

कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी सुविधा वाढविण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. प्रवाशांना ऊन, पाऊस यापासून संरक्षण मिळावे म्हणून १०१ प्रवासी शेल्टर प्लॅटफॉर्मवर उभारण्यात येणार आहेत. या प्रवासी शेड उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 18, 2013, 01:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी सुविधा वाढविण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. प्रवाशांना ऊन, पाऊस यापासून संरक्षण मिळावे म्हणून १०१ प्रवासी शेल्टर प्लॅटफॉर्मवर उभारण्यात येणार आहेत. या प्रवासी शेड उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे प्लॅटफॉर्मवर १०१ प्रवासी शेड उभारण्यात येत आहेत. यासाठी ८५ लाख रूपये खर्ची टाकण्यात आले आहेत. या प्रवासी शेल्टरबरोबरच बसण्यासाठी १७५ बेंच उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील ज्या स्टेशनमध्ये जसी मागणी असेल त्याप्रमाणात या प्रवासी शेल्टर उभारण्यात येत आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.

`कोरे`च्या अनेक स्टेशनवर पूर्णपणे प्लॅटफॉर्म छत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतलाय. त्यासाठी प्रवासी निवारा शेड उभारण्यात येत आहे. या प्रवाशी शेल्टरमुळे पाऊस आणि ऊनापासून प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.