नवी मुंबई पालिकेत नगरसेवकांत `फ्री स्टाईल`

नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी राडा झाला. अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे समर्थक एम. के. मढवी आणि काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी तुफान शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे महासभाच बरखास्त करण्यात आली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 18, 2013, 09:38 AM IST

www.24taas.com,झी मीडिया, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी राडा झाला. अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे समर्थक एम. के. मढवी आणि काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी तुफान शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे महासभाच बरखास्त करण्यात आली.
यापूर्वी दशरथ भगत यांनी महापौर सागर नाईक यांना माईक फेकून मारला होता. काही महिन्यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेना नगरसेविकांनी महापौर आणि उपमहापौर यांना मारहाण केली होती. त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून महासभेत आखाडा पाहायला मिळाला. महासभेत अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव आला असताना नगरसेवक संतोष शेट्टी आणि नगरसेवक एम.के मढवी यांच्यात बाचाबाची झाली.
मढवी महापालिकेच्या अतिक्रमण घोटाळ्यातील आरोपी आहात, त्यामुळे आम्ही सगळे बदनाम झाले आहोत, असं संतोष शेट्टींनी मढवींना सुनावलं. यामुळे खवळलेल्या नगरसेविका विनया मढवी या संतोष शेट्टीच्या अंगावर धाऊन गेल्या. त्यानंतर विनया मढवींचे पती आणि शेट्टी यांच्या फ्री स्टाईल पाहायला मिळाली. यामुळे महासभेत काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

शेट्टी आणि मढवींचे भांडण सोडविण्यासाठी नगरसेवकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आणखीच गोंधळ वाढला. या गोंधळात महासभा गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. महापौर सागर नाईक यांनी राष्ट्रगीत सुरु करुन केले. मात्र, राष्ट्रगीत सुरू असताना सभागृहात हाणामारी सुरुच होती. दरम्यान, आपण चर्चा करीत होतो. आपले लक्ष नव्हते, असे स्पष्टीकरण देत महापौर सागर नाईक यांनी याकडे दुर्लक्ष केले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.