नगरपरिषद निवडणूक : ठाण्यात राष्ट्रवादीची सरशी

ठाणे जिल्ह्यातील जव्हार नगर परिषदेचा निकाला जाहीर झालाय. जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 5, 2012, 02:22 PM IST

www.24taas.com,ठाणे
ठाणे जिल्ह्यातील जव्हार नगर परिषदेचा निकाला जाहीर झालाय. जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे.
जव्हारमध्ये १७ पैकी १४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. तर शिवसेनेला दोन आणि काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले.
डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादीने वर्चस्व निर्माण केले आहे. तेथे २३ पैकी १५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी. शिवसेनेला दोन, भाजपला एक आणि काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीची चांगली घौडदौड असल्याचे बोलले जात आहे.