सरकारचं डोकं फिरलं, दुष्काळी भागात २० कोटींचं गेस्ट हाऊस

साता-यात दुष्काळाची स्थिती गंभीर होती..... दुष्काळाच्या या भयाण स्थितीतही तब्बल २० कोटींचं गेस्ट हाऊस क-हाडमध्ये बांधलं जातंय

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 17, 2013, 07:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
साता-यात दुष्काळाची स्थिती गंभीर होती..... दुष्काळाच्या या भयाण स्थितीतही तब्बल २० कोटींचं गेस्ट हाऊस क-हाडमध्ये बांधलं जातंय. क-हाडमधली जनता दुष्काळाच्या झळा सोसत असताना सरकारी गेस्ट हाऊसवर एवढी उधळपट्टी कशासाठी, असा सवाल केला जातोय.
कराडमध्ये फाईव्हस्टार सरकारी गेस्ट हाऊस उभारलं जातंय. त्याची ही टेंडर नोटीस...दोन मजल्यांचे आणि साधारण ५० हजार स्क्वेअर फुटांच्या या गेस्ट हाऊसच्या बांधकामासाठी खर्च केले जाणार आहेत...तब्बल साडे सतरा कोटी रुपये.... एवढा मोठा खर्च सरकारी गेस्ट हाऊससाठी का... असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. तर, त्याचं उत्तर आहे हे गेस्ट हाऊस फाइव्ह स्टार असणार आहे. कराडमध्ये असं फाइव्ह स्टार गेस्ट हाऊस उभारण्याचं काम सुरु असताना,तिकडे माण - खटाव मध्ये दुष्काळी काय स्थिती आहे ते ऐका..
कराडच्या या सरकारी गेस्ट हाउससाठी केला जाणारा साडे सतरा कोटींचा हा खर्च फक्त बांधकामाचा आहे... फर्निचरसाठी वेगळा खर्च केला जाणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची वेगळी तरतूद करण्यात आलीय. बरं, एवढे २० कोटी रुपये खर्च करून कराडला सरकारी फाईव स्टार गेस्ट हाऊस उभारण्याचं प्रयोजनही कळत नाही. कराड काही जिल्ह्याचं ठिकाण नाही. तीर्थस्थळ किंवा पर्यटन स्थळही नाही. पीडब्ल्यूडीच्या अधिका-यांना विचारलं असता, आधीचं गेस्ट हाऊस जुनं झालंय, एवढंच उत्तर मिळतं.
व्हीव्हीआयपी किंवा फाईव स्टार गेस्टहाऊस ऐवजी कराडमध्ये हॉस्पिटल, शाळा किंवा इतर कोणत्याही लोकोपयोगी कामासाठी हे २० कोटी खर्च करता आले नसते का... किंवा दुष्काळी भागालाही हा निधी देत आला असता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.