नारायण राणेंना दे धक्का, काँग्रेसचा उमेदवार बाद

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांना कणकवलीत जोरदार धक्का बसला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाद ठरले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2013, 07:32 PM IST

www.24taas.com,सिंधुदुर्ग
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांना कणकवलीत जोरदार धक्का बसला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाद ठरले आहेत.
सिंधुदुर्गातील प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे भाजपच्या राजश्री धुमाळे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. धुमाळे यांच्या विरोधात उमेदवार नसल्याने त्या बिनविरोध निवडणून येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
राणे यांना शह देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली होती. राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेने महाआघाडीची स्थापना केली आहे. संदेश पारकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे कणकवलीत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे राणे यांना आगामी निवडणुकीत रोखण्यासाठी ही महाआघाडीची मोट बांधण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याची ही सुरूवात असल्याचे म्हटले जाते आहे.