www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अडचण टाळण्यासाठीच सिंधुदुर्गातल्या शरद कृषी भवन उद्धघाटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंच केसरकारांनी कार्यक्रमातून माघार घेतल्याचं मानलं जात होतं.
सिंधुदुर्गात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नीलेश राणे यांना निवडणुकीत सहकार्य न करता विरोधात भूमिका दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन आणि आदेश असताना घेतली. त्यानंतर पवार यांनी जाहीर सभेत केसरकरांवर टीका केली होती. असे असताना सिंधुदुर्गातल्या शरद कृषी भवन उद्धघाटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचं दीपक केसरकर यांच्याबाबत चर्चा सुरु होती. त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंच केसरकारांनी कार्यक्रमातून माघार घेतल्याचं मानलं जात होतं. मात्र, याला पूर्णविराम मिळाला आहे.
मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी निवडणुकीत जी भूमिका घेतली ते नाटक होतं असा संदेश गेला असता म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही. पवार हे आमचे नेते आहेत. काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे मी व्यासपिठावर जाणे टाळले. कारण आघाडीचा धर्म साहेबांना पाळायचा आहे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये किंवा अडचण निर्माण होऊ नये, अशी माझी भूमिका आहे.
आमचा विरोध हा साहेबांना नाही. त्यांच्याविरोधात बंड नाही. आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत. त्यामुळे जर मी कार्यक्रमाला गेलो असतो तर पवारांचा बंडला पाठिंबा होता, असा संदेश गेला असता. पवास सामील होते, असा संदेश गेला असता. त्यामुळे मी सहभागी झालो नाही, असे केसरकर यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.