www.24taas.com, झी मीडिया, रायगड
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना रायगड पोलिसांनी जिल्ह्यात बनावट गुटखा तयार करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्यात. विशेष म्हणजे ही टोळी एका आलिशान बंगल्यात हा बनावट गुटखा तयार करण्यात मग्न होती.
माणगाव तालुक्यातील मोर्बे गावात पोलिसांनी धाड टाकली आणि पोलिसांच्या हाती लागलंय एक मोठं घबाड... एक दोन नव्हे तर चक्क तीन कोटींचा बनावट गुटका पोलिसांच्या हाती लागलाय. राज्यात गुटखा बंदी असताना या आलिशान बंगल्यात हा बनावट गुटखा तयार केला जात होता. याठिकाणी गुटखा बनविण्यासाठी लागणारे केमिकल, सुपारी तंबाखू यांचाही मोठा साठा सापडलाय.
याकारवाईमध्ये जवळजवळ ३० ते ३५ कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये अनेक जण परप्रांतीय आहेत, अशी माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिलीय.
या टोळीचा म्होरक्या हा सत्ताधारी पक्षाचा पुढारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता रायगड पोलीस या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.