www.24taas.com, ठाणे
ठाण्यात कच-याचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढतंय. प्रत्येक चौकातल्या कचराकुंडीच्या बाहेर पडून कचरा ओसंडून वाहतोय...त्यामुळे ठाणेकर चांगलेच संतापलेत...पण पालिका मात्र आम्ही या समस्येकडे गांभीर्याने पाहतोय असं सांगतेय...
मुंबई नंतर ठाणंही वाढतंय...ठाण्याची लोकसंख्याही वाढतेय...पण लोकसंख्येच्या आकाराप्रमाणे नागरी सुविधा मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीएत...ठाण्यात कच-याची समस्या गंभीर झालीय..चौकाचौकात कचराकुंड्यांची संख्या कमी आहेत...त्यात पालिकेकडून वेळेत कचरा उचलला जात नाही..त्यामुळे ठाण्यात दुर्गंधी बरोबर रोगराईपण वाढतेय...शहरातून दररोज ६५० टन कचरा निघतो...मात्र या कच-याचं योग्य व्यवस्थापन होत नसल्याने सध्या कचरा ही ठाणेकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरलीय....त्यात काही रहिवासी कचराकुंडीत कचरा न टाकत बाहेर टाकत असल्याने शहर गलीच्श होत चाललंय यासाठी पालिकाने याकडे गांभीर्या आणखी गलिच्छ होत चाललंय..अशा बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ठाणेकर करत आहेत...
पालिका पण बेजबाबदार नागरिकांवर खापर फोडून मोकळी होत आहे...कचरा बाहेर टाकणा-यांवर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव महासभेसमोर मांडल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे.कच-याच्या समस्येकडे नागरिक आणि पालिका या दोघांनीही गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे...कारण हाच कचरा नाल्यांमध्ये साठून नाले चोकअप होतात...आणि पाणी रस्त्यावर येते....पावसाळा सुरु व्हायला अजून वेळ असला तरी पालिकेने आत्तापासूनच या समस्येवर युद्धपातळीवर काम करणं गरजेचं आहे...