कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवानिमित्ताने आणखी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. बांद्रा-मडगाव-बांद्रा आणि अहमदाबाद-मडगाव-अहमदाबाद या दोन गाड्या दि. २ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत त्या धावतील.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 1, 2013, 12:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवानिमित्ताने आणखी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. बांद्रा-मडगाव-बांद्रा आणि अहमदाबाद-मडगाव-अहमदाबाद या दोन गाड्या दि. २ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत त्या धावतील.
पहिले आरक्षण फुल्ल झाल्यानंतर पुन्हा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. आरक्षण दिवशी ३१ जुलैलाच दोन मिनिटात आरक्षण दुसऱ्यांदा फुल्ल झाले. त्यामुळे गर्दीवर रेल्वे प्रशासन कसे नियंत्रण मिळवणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, गणपती उत्सवाची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी दोन गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बांद्रा-मडगाव आणि मडगाव-बांद्रा, अहमदाबाद-मडगाव आणि मडगाव-अहमदाबाद अशा गाड्या धावणार आहेत.
या गाडीला १८ डबे असणार आहेत. ०९००९ बांद्रा-मडगाव ही गाडी दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार सुटेल. मध्यरात्री १२.१५वाजता बांद्रा टरमिनसवरून सुटेल. ती मडगावला सायंकाळी ४.३० वाजता पोहोचेल. तर ०९०१० मडगाव-बांद्रा ही गाडी मडगावरून रात्री ८.००वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी दुपारी १.२० वाजता बांद्र्याला पोहोचेल.
अंधेरी, बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, मुरुड, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आरवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, झारप, सावंतवाडी रोड, मुडरे, पेरनेम, थिविंम, करमाळी आदी ठिकाणी या गाडीला थांबे असणार आहेत. तर परतीची ०९०१० ही मडगाव-बांद्रा गाडी दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार मडगावरून सुटेल.
०९४१६ ही अहमदाबाद-मडगाव गाडी अहमदाबादवरून सायंकाळी ४.५५ वाजता सुटेल. ते दुसऱ्या दिवशी ४.४० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी सोमवार, बुधवार आणि शनिवारी सुटेल. तर परतीची ०९४१६ मडगाव-अहमदाबाद ही गाडी मडगावरून रात्री ८.०० वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.२० वाजता अहमदाबादला पोहोचेल मंगळवार, गुरूवार आणि रविवारी ही गाडी सोडण्यात येणार आहे.
नादीअड, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, डहाणू रोड, बोईसल, वसई रोड, पनवेल, रोहा, मुरुड, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, झारप, सावंतवाडी, मडुरे, पेरनेम, थिविंम, करमाळी आदी ठिकाणी या गाडीला थांबे असणार आहेत. या गाडीला १७ डबे असतील.

याशिवाय कोकण रेल्वे मार्गावर आणखी गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये
१) मुंबई सीएसटी-मडगाव मुंबई सीएसटी (ट्रेन नं 01033/01034), आठवड्यातून सहा दिवस.
२) लोकमान्य टिळक (टी) मडगाव-लोकमान्य टिळक (टी) (ट्रेन नं 01045/01046), साप्ताहिक.
३) लोकमान्य टिळक-Pernem-लोकमान्य टिळक (01039/01040), आठवड्यातून दोनदा
४) लोकमान्य टिळक-Pernem-लोकमान्य टिळक (01043/01044), साप्ताहिक.
५) मुंबई सीएसटी-Pernem - मुंबई सीएसटी (01041/01042), आठवड्यातून दोनदा
७) दादर-सावंतवाडी-दादर (01003/01004), आठवड्यातून तिनदा
८) लोकमान्य टिळक-रत्नागिरी लोकमान्य टिळक (01037/01038), दररोज
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.