भोंगळ कारभारामुळे मध्य रेल्वेने रद्द केल्या २३ गाड्या

डोंबिवली आणि कळवा या दोन ठिकाणी पेंटोग्राप तुटल्याचा फटका सेवेसेवला बसला. सकाळच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हात झालेत. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चुकल्यात. त्यामुळे प्रवाश्यांनी रेल्वेला लाखोली वाहीली. दरम्यान, रेल्वेच्या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळी मध्य रेल्वेने २३ रेल्वे सेवा रद्द केल्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 10, 2013, 05:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
डोंबिवली आणि कळवा या दोन ठिकाणी पेंटोग्राप तुटल्याचा फटका सेवेसेवला बसला. सकाळच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हात झालेत. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चुकल्यात. त्यामुळे प्रवाश्यांनी रेल्वेला लाखोली वाहीली. दरम्यान, रेल्वेच्या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळी मध्य रेल्वेने २३ रेल्वे सेवा रद्द केल्या.
मध्य रेल्वेने सलग तिस-या दिवशी प्रवाशांना दणका दिला. मंगळवारी अंबरनाथ इथे रूळांना तडा गेला होता. त्यानंतर काल कल्याणजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. तर आज डोंबिवली आणि कळव्यात पेंटोग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
डोंबिवलीत अडीच तासांच्या दुरूस्तीच्या कामानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली. मात्र या प्रकारामुळे मध्य रेल्वेचे प्रवासी बेजार झालेत. सकाळी ऑफीसच्या घाईच्या काळातच मध्य रेल्वे कोलमडल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. सलग तीन तीन दिवस गाड्या काही ना काही कारणाने बंद पडतायत, मग रविवारी गाजावाजा करून केल्या जाणा-या मेगाब्ल़कचा उपयोग काय, असा सवाल प्रवासी विचारताहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.