इमॅन्युएल अमोलिकने दिली हत्येची कबुली

नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला आज रविवारी मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यांनेच आपण हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती, असी कबुली पोलिसांना दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2013, 03:54 PM IST

www.24taas.com,नवी मुंबई
नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला आज रविवारी मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यांनेच आपण हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती, असी कबुली पोलिसांना दिली.
बिल्डर सुनीलकुमार यांची शनिवारी सकाळी वाशीच्या सेक्टर २८ मध्ये अज्ञात मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावेळी पकडण्यात आलेला मारेकरी व्यंकटेश शेट्टीयार याने अमोलिक याचे नाव घेतले होते. त्याच्या माहितीवरुनच नवी मुंबई पोलिसांनी अमोलिक याला मुंबईतून अटक केली. अमोलिक याच्या नावावर ४० एनकाऊंटर केले आहेत. त्याचा राष्ट्रपती पदक देऊन गौरवही करण्यात आले होते.

२२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
इमॅन्युएल अमोलिक हा माजी एनकाऊंटर स्पेशालिस्टधमकीचा बदला घेण्यासाठी दिली होती सुपारी नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येची इमॅन्युएल अमोलिकने कबुली दिल्याने या प्रकरणाचा तपास होण्यास मदत होणार आहे. सुनीलकुमारने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी आपण त्याला मारण्याची सुपारी दिली होती, अशी माहिती अमोलिकने पोलिसांनी दिली. अमोलिकला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.