वर्ल्ड वाइड वेब @ 25

जगाच्या कुठल्याही कानाकोप-यातून संगणकाच्या द्वारे वेब विश्वातील एखादे पान पाहण्याची सोय उपलब्ध झाली.

Updated: Mar 2, 2014, 07:59 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
इंटरनेटवरील WWW अर्थात वर्ल्ड वाइड वेबच्या जादुई सायबर विश्वाला येत्या 12 मार्च रोजी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. अख्खं जग आपल्या कवेत सामावून घेणा-या वर्ल्ड वाइड वेबचा हा प्रवास.
मेल चेक करायचाय, गुगलवर काही माहिती शोधायचीय किंवा फेसबुकवर मित्र-मैत्रिणीचं स्टेटस पाहायचंय.
तर बोट अगदी सहजपणे टाइप करतात WWW... WWW अर्थात वर्ल्ड वाइड वेब या तीन डब्ल्यूंनी अख्खं जग आपल्या कवेत सामावून घेतलंय.
इंटरनेटवरील WWW च्या जादुई सायबर विश्वाला येत्या 12 मार्च रोजी 25 वर्षे पूर्ण होणार आहेत. हॅरी पॉटर नावाच्या काल्पनिक कथानायकाचा जन्म झाला.
अगदी त्याच सुमारास 12 मार्च 1989 रोजी टिम बर्नर्स ली या ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिकाने या तीन डब्ल्यूंची सर्वप्रथम जगाला ओळख करून दिली.
इंटरनेटच्या माध्यमातून हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच HTTP क्लायन्ट आणि सर्व्हर यांच्यामध्ये यशस्वी संवाद साधण्याचा शोध त्यांनी लावला.
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
जगाच्या कुठल्याही कानाकोप-यातून संगणकाच्या द्वारे वेब विश्वातील एखादे पान पाहण्याची सोय उपलब्ध झाली.
वर्ल्ड वाइड वेबच्या उभारणीत टीम बर्नर्स ली यांना बेल्जियन इंजिनिअर रॉबर्ट कैलिऊ यांनीही मोलाची मदत केली.
या शोधाने माहितीच्या महाजालात सर्वात मोठी क्रांती घडवून आणली. संगणकाच्या शोधानंतर WWW चा शोध हा सर्वात मोठा आविष्कार मानला जातो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.