व्हॉटस अॅप झालाय पोलिसांचा खबऱ्या

पोलिसांना आता पूर्णपणे खबऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, कार व्हॉटस अॅपने पोलिसांचं काम आता अधिक सोप केलं आहे. व्हॉटस अॅपने पोलिसांच्या तपासाला वेग दिला आहे. व्हॉटस अॅपमुळे आरोपींपर्यंत पोहोचायला मदत होत आहे.

Updated: Apr 7, 2014, 04:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोलिसांना आता पूर्णपणे खबऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, कार व्हॉटस अॅपने पोलिसांचं काम आता अधिक सोप केलं आहे. व्हॉटस अॅपने पोलिसांच्या तपासाला वेग दिला आहे. व्हॉटस अॅपमुळे आरोपींपर्यंत पोहोचायला मदत होत आहे.
पोलिसांचे बॅचमेट, मित्रांचे ग्रुप यावर गुन्ह्याची माहिती दिली जाते. आरोपींचे फोटो एकमेकांना पाठविले जातात. यावरून अनेक वेळा आरोपींना ताब्यात घेण्यास मदत होत आहे.
क्षणाचा विलंब न होता हरवलेल्या लोकांचा फोटो सर्वांपर्यंत जाऊन पोहोचतो. यामुळे व्हॉटस अॅपच्या नजरेतून वाचणं आता कठीण झालं आहे.
पोलिसांचे खबरे नेमके कोण आहेत हे आता ओळखणही कठीण झालं आहे, कारण खबऱयांनी दिलेली माहिती व्हॉटस अॅपवर जाऊन पडते. पोलिसांच्या प्रत्यक्ष संपर्कात कुणीही दिसून येत नाही.
हडपसर पोलिसांना ही व्हॉटस अॅपमुळे चार शाळकरी मुलींना शोधून काढण्यात यश आलं आहे. या चारही मुली घर सोडून निघाल्या होत्या. या मुली मनमाडच्या दिशेने गेल्याचे समजल्यावर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून मनमाड पोलिसांच्या काही अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक मिळविले.
पोलिसांनी मोबाईल क्रमांकावर पळून गेलेल्या ४ मुलींची छायाचित्रे पाठविली. त्या छायाचित्रांच्या आधारे मनमाड पोलिसांनी या मुलींना बरोबर ओळखून ताब्यात घेतले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.