व्हॉट्सअॅप झाले तीन तास गप....

फेसबुकने तब्बल १ लाख १८ हजार कोटी रुपये मोजून व्हॉट्सअॅसप खरेदी करण्याचा सौदा केल्यानंतर तीनच दिवसांत व्हॉट्सअॅप युर्जसना फटका बसला आहे. शनिवारी रात्री व्हॉट्सअॅ्प तीन तास बंद राहिल्याने जगभरातील कोट्यवधी युर्जसचा मनस्ताप सहन करावा लागला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 24, 2014, 09:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
फेसबुकने तब्बल १ लाख १८ हजार कोटी रुपये मोजून व्हॉट्सअॅसप खरेदी करण्याचा सौदा केल्यानंतर तीनच दिवसांत व्हॉट्सअॅ प युर्जसना फटका बसला आहे. शनिवारी रात्री व्हॉट्सअॅ्प तीन तास बंद राहिल्याने जगभरातील कोट्यवधी युर्जसचा मनस्ताप सहन करावा लागला.
व्हॉट्सअॅतप बंद पडण्याची ही पहिलीच घटना असून, सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे ते बंद पडल्याचे व्हॉट्सअॅहप कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे युर्जसना कळविले. परंतु या तांत्रिक बिघाडाबाबत अधिक माहिती फेसबुकने आणि व्हॉट्सअॅटपनेही दिली नाही. जगभरातील अनेक युर्जसनी आपली नाराजी ट्विटरवरून व्यक्त केली.
टेलीग्रामची चांदी
व्हॉट्सअॅेप बंद पडल्यानंतर लोकांनी टेलीग्राम या मेसेंजर अॅअपकडे धाव घेतली. व्हॉट्सअॅकपच्या शनिवारी रात्रीच्या बंद काळात तब्बल ८ लाख नवीन लोकांनी टेलीग्राम हे अॅेप डाउनलोड केल्याचे टेलीग्रामने ट्विट केले आहे. तसेच प्रत्येक सेकंदाला १०० हून अधिक लोक टेलीग्रामकडे वळत असल्याने त्यांचा सर्व्हरही धिम्या गतीने चालत असल्याचे म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.