www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
सध्या सर्वत्र तरुणाईत अॅन्ड्रॉईड फोनचा वापर लोकप्रिय झालाय. मात्र, हाच वापर तुम्हाला धोकादायक ठरू शकतो.
* तुमच्या परवानगीविना तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याचा वापर होऊ शकतो.
* तुमच्या परवानगीशिवाय तुमचे ठिकाण लोकेट केलं जाऊ शकतं.
* तुमच्याच मायक्रोफोनचा वापर करुन आवाज रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
या काही केवळ सावधानतेच्या गोष्टी नसून तुम्ही डाऊनलोड केलेल्या अॅप्सला दिलेल्या या परवानगी आहेत. कोणतंही अॅप्स डाऊनलोड करताना सरसकट त्याच्या अटी आणि शर्ती तुम्ही मान्य असल्याचं क्लिक करता. मात्र, तसं करताना स्वतःचा वैयक्तिक संपर्क, ईमेल, मायक्रोफोनचा अमर्याद वापर करण्याची परवानगीही तुम्ही कळत नकळत देता. जीपीआरएस आणि थ्रीजी तुम्ही नेहमी सुरु ठेवत नाही. तरीही बॅकग्राऊंड डेटा ऑपरेट होत असतो. सोशल नेटवर्कवरील चॅट, मेमरी स्टिकमधील डाटा तुमच्या नकळत बघितला जाऊ शकतो... कॉपी केला जाऊ शकतो... तुमच्या हँडसेटच्या अॅप्लिकेशन मॅनेजरमध्ये पाहिल्यास वैयक्तिक आयुष्य हरवून बसल्याचं तुमच्या लक्षात येईल.
या सगळ्या तुमच्या मोबाईलचं मासिक बिल अधिक येऊ शकतं. गुगल हा ओपन सोर्स असून त्याचा वापर करून तुम्हाला ट्रक करणे तुमच्या स्पर्धकांसाठी खूपच सोपं आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा मोठ्या प्रमाणात गैरवापरही होऊ शकतो. मात्र, भारतातल्या सायबर कायद्यांमुळे गुन्हेगारांवर कारवाई होऊ शकत नाही, असं सायबर तज्ज्ञ विकास नाईक यांचं म्हणणं आहे.
गुगलने ही सिस्टीम विकत घेण्यापूर्वी या ऑपरेटिंग सिस्टमचे नाव `डेंजर` असं होतं. याचा वापर हॅकिंग किंवा व्हायरससाठी करण्यात येत होता. गुगलने यात सकारात्मक बदल केले असले तरी याचा वापर करताना काळजी घेतलीच पाहिजे, हेही तितकंच खरं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ